कणकवलीतील शिवाजीनगर येथील पुतळ्याला केले नगरसेवकांनी अभिवादन

गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह स्थानिक नागरिकांची देखील उपस्थिती

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याला नगरसेवक तथा कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर व राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी तेथील नागरिकांसह अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी, दिलीप वरणे, निशिकांत कडुलकर, मंडळाचे अध्यक्ष,राजू वर्णे,हनीफ पिरखान, प्रशांत बुचडे, अशोक मर्गज,घाडी,म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!