कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्तांची आचरा रामेश्वर मंदिरास भेट
आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराला कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी भेट देत श्रीदेव रामेश्वर यांचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी सचिव अशोक पाडावे यांनी त्यांना सन्मानित केले. देवस्थानच्या विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांच्या समवेत उपआयुक्त कोल्हापूर विभाग कांचन सुपाते जाधव, सहाय्य्क धर्मादाय आयुक्त शरद वाळके, अधीक्षक कोल्हापूर अरुण भुईबंर, अधीक्षक सिंधुदुर्ग अमोल वारघडे, ऑडिटर अभय सुकाळी सिंधुदुर्ग उपस्थित होते.
आचरा, प्रतिनिधी