सरंबळमध्ये शेतकऱ्यांना शासकीय मका बियाण्यांचे वाटप

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते वितरण

मागणीनुसार बियाणे पुरवठा करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

सरंबळ येथील शेतकऱ्यांना शासकीय पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुधारित मका बियाण्यांचे वितरण जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या बियाण्यांचा खरीप हंगामात शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सरपंच रावजी कदम, ग्रामसेविका, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, शेतकऱ्यांची मागणी असताना तुलनेने कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध झाल्याची बाब निदर्शनास येताच रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार बियाण्यांचा पुरेसा पुरवठा होणे आवश्यक आहे. मका लागवड करू इच्छिणारा एकही शेतकरी बियाण्यांपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

error: Content is protected !!