सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवाना नूतनीकरण करण्याचे आवाहन

प्रत्येक तालुका निहाय ठरवुन देण्यात आले आहेत दिवस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या शस्त्र परवान्याची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे अशा परवानाधारकांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्या करिता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या नूतनीकरणासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज दाखल करावा लागणार असून, शस्त्र परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण करण्याकरता a 3, चा नमुन्यातील पासपोर्ट फोटो लावलेला अर्ज सादर करायचा आहे. शस्त्र वापरण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत s3 नमुन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र, शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला s4 फॉर्म संबंधित पोलीस निरीक्षक यांच्या सही शिक्क्यानिशी अर्जासोबत सादर करायचा आहे. शस्त्र पडताळणी केल्याबाबतचे पोलीस निरीक्षक यांच्याकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र, सरपंच, पोलीस पाटील किंवा नगराध्यक्ष यांच्याकडील वर्तणुकीचा दाखला, किंवा आधार कार्ड, मूळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा, परवाना नूतनीकरणासाठी 5 वर्षाकरिता 2500 हजार रुपये शासन जमा करणे आवश्यक आहे. परवाना नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास प्रती वर्ष 500 रुपये दंड, विलंब झाल्या बाबत सबळ पुरावा सादर करावा, शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी नमुन्यातील a3 चा अर्ज तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज पोस्टाने किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठवले जाणार नाहीत. एकाच दिवशी परवाना नूतनीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून दिवस ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये देवगड तालुक्याकरता 1, 4 व 5 डिसेंबर, सावंतवाडी तालुक्याकरिता 6,7,8 डिसेंबर दोडामार्ग 11 व 12 डिसेंबर, मालवण मध्ये 13, 14 व 15 डिसेंबर, वैभववाडी 18 व 19 डिसेंबर, कणकवली 20, 21 व 22 डिसेंबर कुडाळ 26, 27 डिसेंबर, वेंगुर्ले 28, 29 डिसेंबर या दिवशी परवानाधारक आणि शस्त्र परवाने नूतनीकरणासाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!