दिवाळीच्या तोंडावर कुडाळ कणकवली मध्ये बेकरींवर कारवाई मुळे खळबळ

अन्न व औषध प्रशासनाकडून ४३ हजार ५८५ रुपयांचा अन्नसाठा जप्त

भेसळ आढळल्यास तात्काळ तक्रार नोंदवा, विभागाचे आवाहन

दिवाळी सणानिमित्त मिठाई, फराळ व इतर अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. ५ दिवस चाललेल्या या मोहिमेत एकूण 13 तपासण्या करण्यात आल्या आणि १७ अन्न नमुने घेण्यात आले. संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये ४३,५८५ रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये कुडाळ : मावा – ९८ किलो (किंमत ₹३९,२००/-), कणकवली : खवा – ६ किलो (किंमत ₹२,१४५/-), कणकवली : पोहा चिवडा – ३ किलो व शेव चिवडा – ५ किलो, एकूण ८ किलो (किंमत ₹२,२४०/-) यावर कारवाई करण्यात आली यामध्ये मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, खवा/मावा, मिठाई, फरसाण अशा वस्तूंचा समावेश आहे.
जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधित विक्रेते/उत्पादकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहाय्यक आयुक्त यांनी दिला आहे. सणासुदीच्या काळात मिठाई व फराळ परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करा व, पक्के बिल घ्यावे, अनैसर्गिक गडद रंगाचे पदार्थ टाळावेत आणि पदार्थांची मुदत तपासावी. भेसळीची शंका आल्यास तक्रार नोंदवावी. असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!