फळपीक विमा योजनेस वाढीव मुदत

आंबा व काजू फळपीकांसाठी शेतकऱ्यांना फळ पीकविमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा

दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू राहणार.

कोकणातील आंबा व काजू या पिकांसाठी फळपिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 असा होता. तथापि,पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे फळपीक विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले. त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन आता दिनांक 4 व 5 डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त (वाढीव ) दिवस पिक विमा पोर्टल आंबा व काजू या फळपिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे. तरी देवगड तालुक्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कैलास ढेपे,तालुका कृषि अधिकारी,देवगड हे करीत आहे.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!