बाल एकपात्री अभिनय स्पर्धेत देवदत्त घोणे प्रथम

बालदिन निमित्त एस के प्रॉडक्शन हाऊसचे आयोजन
लवकरच आंतराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल
निलेश जोशी । कुडाळ : एस के प्रॉडक्शन हाऊस यांच्यावतीने १४ नोव्हेंबर या बाल दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बाल एकपात्री अभिनय स्पर्धेत देवदत्त घोणे याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा आणि बाल एकपात्री अभिनय स्पर्धा यांना मिळालेल्या यशामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म स्पर्धा देखील घेण्यात येईल असे एस.के. प्रॉडक्शनचे संस्थापक सचिन कोंडसकर यांनी सांगितले.
एस के प्रॉडक्शन हाऊस यांच्यावतीने १४ नोव्हेंबर या बाल दिनाचे औचित्य साधून बाल एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. . १२ नोव्हेंबर रोजी अनसिन कोकण या युट्युब वाहिनीवर सर्व स्पर्धकांचे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. प्रेक्षकांची आवड आणि परीक्षकांचे मत लक्षात घेऊन उकृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली.
१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अनसिन कोकण इंस्टाग्राम लाईव्ह वरून विजेत्या स्पर्धकांची नावे एसके प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक सचिन कोंडस्कर यांनी जाहीर प्रसिद्ध अभिनेत्री रुचिता शिर्के, युवा उद्योजक आणि या स्पर्धेचे प्रायोजक जयतीर्थ राऊळ, या स्पर्धेचे संयोजक हर्षवर्धन जोशी उपस्थित होते. . बाल एकपात्री अभिनय स्पर्धा 2023 मध्ये प्रथम क्रमांक देवदत्त घोणे, द्वितीय क्रमांक आरव आईर, आणि तृतीय क्रमांक सावी मुद्राळे यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे प्रसिद्ध रंगकर्मी केदार सामंत आणि अमित अनंत घाडगे मुंबई यांनी केले. बाल एकपात्री अभिनय स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता दोन्ही परीक्षकांनी निःपक्षपाती परीक्षण करून स्पर्धेची पातळी वाढवली, असे सचिन कोंडसकर यांनी सांगितले. त्याच बरोबर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केले त्याचे एसके प्रोडक्शन हाऊसच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
भविष्यात आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा मानस – कोंडसकर
मागील दोन महिन्यात आंतराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा आणि बाल एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करून एसके प्रॉडक्शन हाऊसने संपूर्ण जगभरातील कलाकारांना यौ ट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून डिजिटल रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. या दोन्ही स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे येत्या काळात आंतराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्याचा मानस आहे. लवकरच या नवीन उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती आपल्या पर्यंत पोहचवली जाईल असे एसके प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक सचिन कोंडस्कर यांनी सांगितले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.