मच्छीमार गोट्या परब याला भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली मदत…

नरकचतुर्थीच्या पहाटेला शिरोडा, केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण उर्फ गोटया परब यांच्या मच्छी व्यवसायाच्या शेड मधील ठेवलेल्या जाळया, होडी व इतर साहित्य याला आकस्मित आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब, प्रथमेश तेली यांनी आज घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थिती पहाणी करुन माहिती घेतली. आगीत नुकसान झालेल्यांना विशाल परब यांनी आर्थिक मदत केली.
या वेळी शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सुधीर नार्वेकर, मयूरेश शिरोडकर, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, आरवली सरपंच समीर कांबळी, शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य तातोबा चोपडेकर, शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार ग्रामस्थ प्रशांत बटा, सत्यविजय पेडणेकर, सदाशिव तारी, सुहास निकम,सावळाराम बटा, संदेश सावंत, देविदास कुबल, वासू तारी, प्रमोद मोठे, गोपाळ बटा, तृप्तेश चोडणकर, भाई घाटवळ, आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी, सावंतवाडी