झारापमधे बालदिन उत्साहात

प्रतिनिधी । कुडाळ : निरागसता,, खळखळता उत्साह ,कायम उत्सुकता आणि अद्भुततेचे वेड याने बालपण भारावलेले असते. या गुणावर शाबासकीची थाप देण्यासाठी,लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. मात्र “रोजचा दिन” हा बालदिन होण्याची गरज असल्याचे मत झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांनी व्यक्त केले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त झाराप येथे काल मंगळवार ता.१४ ला झाराप ग्रामपंचायतच्या वतीने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
चिमुकल्याना झारापवासीयानी खास शुभेच्छा दिल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सरपंच दक्षता मेस्त्री,उपसरपंच मंगेश गावकर, प्रताप कुडाळकर, सुमन हरमलकर,अक्षरा तेली, वैभव हरमलकर,अमोल कुडाळकर, साक्षी तेली आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली खानोलकर यांनी केले. यावेळी लहान आणि मोठ्या दोन गटात रंगभरण स्पर्धा घेण्यात आली मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी यात सहभागी झाले होते. निसर्गचित्रापासून, व्यक्तीचित्रापर्यंत विविध चित्रे विद्यार्थ्यांनी रंगवली .यानंतर संगीत खुर्ची स्पर्धेत मुले सहभागी झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षीसे देण्यात आली. अमोल तेली यांचे मोलाचे सहकार्य कार्येक्रमाला लाभले .वैभव हरमलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!