भाजप कार्यकर्त्यांची धनगर बांधवांसोबत दिवाळी

फराळासह केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची दिली माहिती

निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनावरून व माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार भाजपा कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या वर्षीची दिवाळी नेरूर येथील धनगर वस्तीत जावून साजरी केली. यावेळी धनगर बांधवांना फराळ, दिवे, जीवनावश्यक वस्तू, बिस्कीट व चॉकलेट भेट देण्यात आली.
यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी धनगर कुटुंबीयांच्या घरी दिव्यांची रोषणाई करून त्यांच्यासोबत फराळ केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. याचबरोबर धनगर बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही देण्यात आली. समाजातील या वंचीत घटकांना आपण त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी या कृतीने त्यांना दिला.

त्यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, भाजपा नेते राजू राऊळ, राज्य कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, तेंडोली माजी सरपंच भाऊ पोतकर, माड्याचीवाडी शक्ती केंद्रप्रमुख दाजी गोलम, हुमरमळा शक्ती केंद्रप्रमुख शेखर परब, शाम गावडे, अभय सामंत, प्रभाकर देसाई, सुरजित गावडे, किशोर गावडे, जयराम परब, संतोष गावडे, शेखर मुळम, निलेश मेस्त्री, आनंद नेरुरकर, ग्रा.प.सदस्या अनुजा नेरुरकर, पुजा लिंगे, प्रविण लिंगे, काशिनाथ कुंभार, शरद परब, जाँली फर्नांडिस व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धनगर समाजातील युवा कार्यकर्त्यांनी सर्वच भाजप कार्यकर्त्यांचे या अनोख्या भेटीबद्दल गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त केले. यावेळी नवलु झोरे, सहदेव झोरे, नावु झोरे, सिताराम झोरे, बाबू झोरे, देऊ झोरे, सोनू झोरे, नलिनी झोरे, दिपाली झोरे, प्रतीक्षा झोरे, उज्वला झोरे, सेजेल झोरे व धनगर कुटुंबीयतील सदस्य उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!