कणकवली शहरात मटका व्यावसाय जोमात

पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर मटका सुरू असूनही दुर्लक्ष

कणकवली पोलिस अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करणार काय?

कणकवली शहरात गेले काही दिवस अवैध मटका व्यवसाय जोरदार सुरू असून, पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर शहरात खुलेआम मटका व्यवसाय सुरू असताना याबाबत पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनधिकृत धंद्यांच्या विरोधात तसेच अमली पदार्थांच्या विरोधात पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांनी कडक पावले उचललेली असताना कणकवली शहरात मटका व्यवसायासारख्या चालणाऱ्या अवैध व्यवसायावर पोलीस कारवाई न करणया मागची नेमकी कारणे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. कणकवली शहरातील अनेक पान टपरीच्या पासून ते काही दुकानांमध्ये देखील खुलेआम मटका स्वीकारला जात असताना पोलिसांच्या डोळ्या देखत चाललेल्या या अवैध व्यवसायांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबरोबर तालुक्यात काही भागांमध्ये गोवा बनावटीची दारू विक्री देखील खुलेआम सुरू असून याकडे देखील डोळे झाक केली जात आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!