शीळ गावचे माजी पोलीसपाटील खेमाजी गोंडाळ यांचा‌ प्रथम स्मृतिदिन पन्नास वारकऱ्यांना विविध अध्यात्मिक धर्मग्रंथ भेट देऊन साजरा

खारेपाटण : राजापूर तालुका ग्रंथालय चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांच्या संकल्पनेतून हा ग्रंथभेटीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी खेमाजी गोंडाळ यांचे मुलगे शिवाजी गोंडाळ, संतोष गोंडाळ, अशोक गोंडाळ, पंढरीनाथ गोंडाळ,पुतणे कृष्णा गोंडाळ, गणेश गोंडाळ,भाचे रामचंद्र मोंडे,पुतणी राजेश्री मोंडे यांच्या हस्ते ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
स्व.खेमाजी गोंडाळ हे शिळगावचे माजी पोलीस पाटील.पंढरीचे निस्सीम वारकरी.त्यांनी सुमारे३५ वर्षे पंढरीची वारी केली.अनेकांना पंढरीची वाट दाखवली.तसेच ते आखाडा खेळाचे जाणकार -मार्गदर्शक होते.संगीत भजनी बुवा होते.डफावरील शाहीर कलाकार.होते.आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जकडी कलेचे अध्यात्मिक गुरू होते. नवलादेवी प्रासादिक गोंडाळवाडीजाकडी कला मंडळाला संपूर्ण कोकणात नावलौकीक मिळवून देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिळं गावातील‌ व उन्हाळे गावातील वारकऱ्यांच्या हरिपाठ कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शीळ वारकरी मंडळाचे अध्यक्ष, शिळगावाचे माजी सरपंच रवीन्द्र. नागरेकर यांनी खेमाजी गोंडाळ यांच्या अध्यात्मिक कार्याची उपस्थित मंडळींना माहिती दिली.
यावेळी नामदेव नागरेकर,सुरेश बाईत, गोपाळ गोंडाळ,सहदेव नागरेकर,मनोहर गोंडाळ,भरत नाग रेकर,दिलीप गोंडाळ,सीताराम भोवड,संतोष बाईत,चंद्रकांत नाग रेकार, कृष्णा नागरेकर,ममता पुजारे,नंदा गोंडाळ, पार्वती नांगरेकर , संजीवनी बा‌ईत, संतोष कणेरी,रामू पुजारे, प्रकाश सोड्ये,मधुकर गोंडाळ आदी‌‌ वारकरी संप्रदाय उपस्थित होता.

अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण

error: Content is protected !!