अरविंद बुवा पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर केंद्रातील जि.प. शाळेंनमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप……!

सतीश रघुनाथ सावंत (मुंबई) यांचे दातृत्व

बँक आँफ इंडिया निवृत्त अधिकारी सतिश रघुनाथ सावंत(मुंबई) यांच्या दातृत्वातून व सुप्रसिद्ध बुवा अरविंद पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर केंद्रातील शाळा चिंदर नं 1, शाळा चिंदर बाजार, पडेकाप, अपराज कोंडवाडी, कुंभारवाडी, पालकरवाडी, भटवाडी, सडेवाडी अशा शाळांतील मुलांना शैक्षणिक साहित्य अरविंद बुवा पाताडे, अनिल पाताडे, बाळा पाटणकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सतीश सावंत हे अशा प्रकारचे दातृत्व नेहमी समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत करत असतात.
यावेळी सरपंच सौ. स्वरा पालकर, चिंदर ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे खजिनदार अनिल पाताडे, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, शिक्षक-प्रविण तेली, पंढरीनाथ करवडकर, स्मिता जोशी, माधुरी पाटील, नवनाथ भोळे, भिमाशंकर शेतसंदी, राजेंद्र चौधरी, लक्ष्मी चिंदरकर, गंगाराम पोटघन, निशिगंधा वझे, सामाजिक कार्यकर्ते बाळा पाटणकर, लक्ष्मी पालकर आदी उपस्थित होते. स्वागत प्रविण तेली, नवनाथ भोळे यांनी तर आभार भिमाशंकर शेतसंदी, निशिंगधा वझे यांनी मानले

अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा

error: Content is protected !!