वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांवमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी वेधले लक्ष
कुडाळ : वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ व शेती नुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी लक्ष वेधले. या समितीने सर्व आढावा घेत नुकसानबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता येईल याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे समितीने सांगितले.
वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणाऱ्या फळ भातशेती नुकसानीबाबत राज्यपातळीवर समिती वन्यजीव प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत आम. भास्कर जाधव, आम. नितेश राणे, आम. शेखर निकम, आम. योगेश कदम यांच्यासह कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन कृषी विभाग पुणे आयुक्त, दापोली विद्यापीठ कुलगुरू यांचा समावेश आहे. या समितीचे कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन दापोली विद्यापीठाचे डॉ. योगेश परुळेकर, डॉ. प्रकाश क्षीरसागर, डॉ. विनायक पाटील, कृषीविभाग कोल्हापूर जॉईंट डायरेक्टर बिराजदार, कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन श्रीरसागर यांनी माणगांव खोऱ्यात दादा बेळणेकर, प्रकाश माणगांवकर, दीपक शिरोडकर या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची, फळझाडांची पाहणी केली. या पाहणीच्यावेळी दादा बेळणेकर, किशोर शिरोडकर, योगेश बेळणेकर, अशोक सावंत, माणगाव खोऱ्यातील शेतकरी उपस्थित होते.
बेळणेकर यांनी वन्यप्राणी व पक्ष्यांकडुन होणाऱ्या फळ व शेतीनुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आम्ही
शेतकरी बागायतदार फळ उत्पादक व्यवसायीक सिंधुदुर्ग एकत्रित निवेदन देतो की, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याबाबत विचार व्हावा. सिंधुदुर्ग जिल्हयातील शेती व बागायत ही वनांच्याजवळ असल्याने वन्यप्राणी शेतात घुसुन शेती बागायतीचे नुकसान होते. सदर नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शासकीय नुकसान भरपाईची रक्कम भरपाईची योग्य ती वाढ देऊन मिळावी. तसेच नारळ, काजू, आंबा, फणस, केळी, पेरू, बांबू, अननस, सुपारी, कोकम, सिताफळ, भात, नाचणी, कुलीथ, उडीद, वाली, चवळी, भुईमुग, ऊस, मका, सोयाबिन, ज्वारी, सूर्यफुल, पाम इत्यादी पिकांचे नुकसान वन्यप्राणी रानडुकर, माकड, केडली, (लाल तोंडाची माकडे ) गवा, निलगाई, मोर, साळींदर, शेकरू, गिधाड, कोल्हा, मोठयाप्रमाणात करतात नैसर्गीक आपत्ती वीज पडून मरणाच्या फळझाडांची ही नुकसान भरपाईची तरतूद आजच्या बाजारभावाप्रमाणे होऊन मिळावी. वन्यप्राण्यांकडून फळनुकसानीसंदर्भात मिळण्याच्या अर्थसहाय्या कामी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही या निवेदनासोबत फळझाडे फळे व भाव इत्यादीचे मागणी पत्रक जोडत आहोत अपरिपक्व झाडाचे नुकसान झाले. तर त्यासाठी येणारी नुकसान भरपाई ते झाड परिपक्व झाले एकून एकंदर त्या झाडाच्या आयुष्यमानाशी असावे. शेतकरी बागायतदारांनी प्रमुख झाडांची मागणी केली. दरम्यान, याबाबत समितीने शासनाच्या परिपत्रकानुसार जे काही करता येईल त्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता येईल यादृष्टीने तातडीने निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.
प्रगतशील शेतकरी दादा बेळणेकर यांच्या फळबागांची राज्य समितीने पाहणी केली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ