शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उत्सव समितीचे प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा , शिवचरित्रावर आधारित नाट्यपुष्प व डबलबारीचा जंगी सामना असे विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे शिवजयंती निमित्त गावातील प्रत्येक घरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची छबी असलेला भगवा झेंडा उभारण्यात येणार असून त्यासाठी उत्सव समितीच्या वतीने प्रत्येक घरात आदल्या दिवशी पर्यंत झेंड्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच यासाठी गावस्तरावर वेगळी समिती स्थापन करण्यात आली आहे.
शिवजयंती उत्सवानिमित्त समिती प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी बैठक सांस्कृतिक सभागृह कोनवाडा येथे पार पडली यावेळी मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुनाथ देऊलकर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष उमेश पेडणेकर,खजिनदार किरण गावडे, संचालक मनोहर गावकर, माजी सरपंच नाना पेडणेकर, मयुर चराटकर, सामाजिक कार्यकर्ते आपा आमडोसकर, आनाजी देसाई, सुरेंद्र कोठावळे, न्हानू कानसे,वैभव राणे, स्वामी पेडणेकर, सुनील सावंत, दाजी हांडेकर, संकेत राऊळ आदीसह इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चर्चे दरम्यान कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली यात बबन राणे यांच्या संयोजनातून प्रत्येक घरासमोर शिवजयंती निमित्ताने गुढी उभारण्यात यावी असे ठरविण्यात आले असून त्यासाठी संपूर्ण गावातील घरात लागणारे शिवाजी महाराजांची छबी असलेले झेंडे ते स्वतः पुरविणार असून त्यासाठी समिती सुद्धा निवडण्यात आली. तसेच इन्सुली गावठाण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या उत्सवा शिवाय अन्य कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले यात इन्सुली गावातील दहाही शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता हजर राहणार आहेत त्यात प्रत्येक शाळेला शिवचरित्रावर आधारित कार्यक्रम करावयाचा आहे त्यातून अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत.
तसेच त्याच दरम्यान गावातील शिवप्रेमींची संत सोहिरोबानाथ मंदिर येथून शोभा यात्रा निघणार आहे यात ढोलपथक व पालखी हे आकर्षण असणार आहे. सदरची यात्रा डोबाशेळ येथून कोनवाडा, सावंतटेंम्ब, कुडवटेंम्ब , खामदेवनाका येथून धुरीवाडी मार्गे गावठण येथे कार्यक्रम स्थळी येणार आहे. कार्यक्रम दरम्यान अल्पोपहाराची सोय उत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. स्पर्धेनंतर लागलीच बक्षीस वितरण होणार असून त्यानंतर सकाळच्या सत्रातील कार्यक्रम संपणार आहे
तर रात्री ठीक 8 वाजता नारायण उर्फ बबन राणे दिग्दर्शित स्थानिक 13 कलाकार आधी लगीन कोंढाण्याचे ही नाट्यप्रवेशिका होणार आहे तर त्यानंतर रात्री ठीक 8 .30 वाजता निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडिल ता.देवगड गुरुवर्य बुवा प्रकाश पारकर बुवा व्यंकटेश नर पखवाज – सागर कदम तबला – भावेश लाड विरुद्ध सद्गुरु संगीत भजन मंडळ कुडाळ गुरुवर्य बुवा श्री विशाल राणे बुवा वैभव सावंत पखवाज निखिल पावसकर तबला रोशन सावंत यांच्यात आमने सामने डबलबारीचा जंगी सामना होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष व इन्सुली ग्रामस्थ यांनी केले आहे

प्रतिनिधि / कोकण नाऊ / सावंतवाडी

error: Content is protected !!