सृजनाच्या नव्या वाटा ढुंडाळणारी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली . डॉ शिवलकर प्राचार्य डाएट सिंधुदुर्ग.

कणकवली/मयुर ठाकूर

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला डाएटचे प्राचार्य डॉ शिवलकर यांनी भेट देवून शैक्षणिक कामकाजाची जवळून पहाणी केली . त्यांच्या बरोबर टीमध्ये निलेश पारकर ‘ डॉ .यादवसर सौ . दळवी मॅडम सौ देसाई मॅडम हजर होते . प्राचार्य डॉ शिवलकर साहेब यांनी प्रथम प्रशालेचे ग्रंथालयाची पहाणी केली ज्या शाळेचे ग्रंथालय पुस्तकांनी सुसज्ज असते त्यांचा विकास हा नेहमी होत असतो . ग्रंथालयात आठशे ग्रंथ संदर्भ ग्रंथ वृत्तपत्रे नियतकालिके मासिके तसेच विश्वकोश संस्कृती कोश शब्दकोश पाहून समाधान व्यक्त केले ग्रथंपाल महानंद पवार यांनी ग्रंथालयाच्या व्यवस्थेची आणि वाचन संस्कृतीची यथोचित माहिती दिली. प्रशालेतील विविध योजना शिक्षण विभाग सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी कुडाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने अनेक शासकीय योजना राबविण्यात आल्या . या योजनेचा जागर या संदर्भात श्री वणवे सर सौ जाधव मॅडम श्री कांबळे सर यांनी प्राचार्य डॉ शिवलकर साहेब यांना माहिती देवून शाळेत लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचा माहिती दिली . तसेच पालक मिटींग घेऊन योजनांचा जागर घडवून आणला . त्याच बरोबर सर्व योजनांचे बॅनर करून शाळेच्या भिंतीवर लावण्यात आले . सर्व पालकांना त्या योजनेची माहिती जवळून मिळते. विद्यामंदिर प्रशाला म्हणजे अनेक प्रभावशाली उपक्रम राबविणारी शाळा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणली जाते या वर्षी प्रशालेत संगणक प्रशिक्षणांचा विभाग सुरु केला आहे. जीवन कौशल्य असणारा संगणक अभ्यासक्रम स्वतः शाळेने तयार केला असून नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम संगणकाचे सर्व घटक काळाच्याही पुढे जाऊन भविष्याचा वेध घेणारा अभ्यासक्रम आहे हा तीन महिण्याचा कोर्स तयार केला आहे . दोनशे विद्यार्थी याचा लाभ दररोज घेत आहेत . यासाठी संगणक प्रशिक्षक श्री काणेकर सर ‘ सौ केळुसकर मॅडम ‘ श्री बर्डे सर , श्री नेताजी जाधव सर मार्गदर्शन करतात . क्रीडा विभाग प्रशालेत अद्यावत आहे. विविध खेळात विद्यार्थी प्राविण्य मिळवत आहे तालुका जिल्हा ‘ राज्य व विभाग स्तरावर विद्यार्थी यश संपादन करत आहेत. रानभाज्या प्रदर्शन वृक्ष लागवड नाविण्य पूर्ण नागपंचमी तसेच पर्यावरण पुरक राखी ‘ वृक्ष मित्र राखी बंधन पाककला प्रदर्शन विज्ञान कार्यशाळा ‘ हरित सेना वृक्ष संवर्धन उपक्रम परसबाग नियोजन उपक्रम योगसाधना उपक्रम अमराठी .भाषिक प्रशिक्षण ‘ गणित इंग्रजी विशेष मार्गदर्शन सर्व स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन वर्ग या सारखे उपक्रम विद्या मंदिर प्रशालेत प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकसित करण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशिल आहेत विद्यामंदिर प्राथमिक विभागाची प्राचार्य डॉ शिवलकर साहेब यांनी पहाणी करून प्राथमिक शिक्षणाचा उंचावलेला दर्जा पाहून समाधान व्यक्त केले तसेच इंग्लिश मिडियम प्रशाला पाहून नाविण्य पूर्ण उपक्रम राबविणारी शाळा म्हणून समाधान व्यक्त केले सर्व अध्यापकांची मिटींग घेऊन . उद्बोधनपर मार्गदर्शन करून ज्ञानाची ऊर्जा सर्वामध्ये निर्माण केली . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी. जे कांबळे सरांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल डॉ . शिवलंकर साहेब यांनी सत्कार केला . कांबळे सरानी विद्या मंदिर प्रशालेच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेऊन माहिती दिली. श्री वणवे सरांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले . पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . विद्यामंदिर माध्यमिक प्रशाले विषयी शिक्षणाधिकारी चौगुले साहेब श्री कुडाळकर साहेब यांच्या वतीने डॉ. शिवलकर साहेब यांनी गौरोव उद्‌गार काढले . या प्रसंगी सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . आभार सौ जाधव मॅडम यांनी मांडले .

error: Content is protected !!