चिंदर येथील प्रसिध्द व्यापारी राजेंद्र कोदे यांचे निधन

आचरा – मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील रहिवाशी आणि व्यावसायिक राजेंद्र(राजु) कोदे यांचे काल 6 सप्टेंबर रोजी गोवा बांबुळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. चिंदर कुंभारवाडी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कोदे चिंदर गावच्या माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य राजश्री कोदे यांचे पती तर उद्योजक संतोष कोदे यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, भावजया, बहिनी, पुतणे, आई, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चिंदर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.