एस एम प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

एस. एम. हायस्कूल कणकवली व ज्युनिअर कॉलेज मध्ये मंगळवार दि. 05/09/2023 रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे विशेष म्हणजे या शिक्षक दिन उत्सवाची पूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वत: पार पाडली. या शिक्षक दिन कार्यक्रमाचे दोन सत्रामध्ये विभाजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत सकाळ सत्रात ज्युनिअर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली तर दुपार सत्रात माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. ज्युनिअर विभागातून 50 विद्यार्थी शिक्षक म्हणून व माध्यमिक विभागातून विद्यार्थी शिक्षक म्हणून 105 विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले. तर शिक्षकेतर कर्मचारी म्हणून दहा विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे आपली भूमिका पार पाडली. यामध्ये प्राचार्य म्हणून इयत्ता बारावीच्या कु. आर्या धुरी व मुख्याध्यापिका म्हणून दहावीच्या कु. भावना निग्रे या विद्यार्थिनींनी पद स्वीकारले . तर दहावीचाच विद्यार्थी कुमार ओंकार जाधव यांने उपमुख्याध्याप पदाची भूमिका उत्तम प्रकारे पेलली.
सकाळ व दुपार सत्रातील शिक्षक दिन कार्यक्रमाचा सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पडला. शाळेच्या वंदनीय कै. सदानंद पारकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी. एम. नलावडे होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एस. एम. प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके, पर्यवेक्षक जी.ए. कदम, सी.डी.नलावडे सौ एम आर पाटील विद्यार्थी शिक्षक प्राचार्या कु. आर्या धुरी, मुख्याध्यापिका कुमारी भावना निग्रे, विद्यार्थी शिक्षक उपमुख्याध्यापक कुमार ओंकार जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी.एम. नलावडे यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ एस. सी. गरगटे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये गुरुचा महिमा वर्णन केला. यानंतर अध्यापन कामकाजावरून उच्च माध्यमिक विभागातून कु.दिक्षा गोवेकर ,कु. प्रांजल सावंत,कु.मंदार गोसावी,कु.संचाली डोंगरे तर माध्यमिक विभागातून कु. सोहम मर्गज व कु. प्रेरणा देऊलकर या दोघांची आदर्श विद्यार्थी शिक्षक म्हणून निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी शिक्षक प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. यानंतर कुमार सोहम कांबळे व कुमारी जागृती आंबेरकर या विद्यार्थ्यांनी, तर कुमारी आर्या कदम व कुमार सोहम मर्गज,गीता जाधव या विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे विद्यार्थी उपमुख्याध्यापक व विद्यार्थी मुख्याध्यापिका यांनी शिक्षक म्हणून काम करत असताना आलेले अनुभव आपल्या मनोगतामध्ये कथन केले. यानंतर एस. एम. प्रशाला मुख्याध्यापक जी.एन. बोडके यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी जीवनात गुरुचे महत्त्व काय आहे हे विशद केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी.एम. नलावडे यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांची उदाहरणे देत गुरुचे स्थान व विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मौलिक मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका कुमारी पूर्वा प्रभूदेसाई व कु.आरोही ठाकूर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार एस. एम. प्रशाला सहाय्यक शिक्षक एस. एम. पवार यांनी मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण