कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास विशेष पुरस्कार जाहीर

कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास २०२०- २१ चा नियतकालिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण विशेष सन्मान नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने नव महाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत दरवर्षी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा आयोजन केली जाते. विद्यार्थ्यांच्या विचारांचे व भावनांचे प्रतिबिंब नियतकालिकामध्ये कशा रीतीने उमटले हे पाहून नियतकालिकांचा आणि विद्यार्थ्यांच्या लेखणीचा सन्मान करण्याच्या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चा हा उपक्रम राबवला जातो.
२०२०-२१ या वर्षात राज्यभरातील महाविद्यालयाकडून नियतकालिके स्पर्धेसाठी मागविण्यात आले होते.त्यात सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून विशेष सन्मान या विभागातून कणकवली महाविद्यालयाच्या कनक या नियतकालिकाची निवड झाली आहे.कणकवली महाविद्यालयात आयोजित लवकरच एका खास समारंभात हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून सन्मानपत्र व स्मृती चिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कणकवली महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयाच्या नियतकालिक विभागाने एकदाही खंड पडू दिला नाही.कोरोनाच्या काळात सुद्धा दर्जेदार नियतकालिक काढण्याची परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवली होती. याची दखल घेऊन कनक या नियतकालिकास विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.महाविद्यालयाच्या इतिहासातील ही अत्यंत गौरवाची बाब ठरली.
दरम्यान कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकाचा पहिल्यांदाच मोठा सन्मान होत आहे याबद्दल कनक नियतकालिक विभागाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. आर. बी. चौगुले, संपादक डॉ. सोमनाथ कदम, विभागीय संपादक प्रा. सीमा हडकर ,प्रा.स्वीटी जाधव प्रा. भिकाजी कांबळे, प्रा. मीना महाडेश्वर, प्रा.विजयकुमार सावंत व डॉ. मारोती चव्हाण तसेच लेखक, कवी विद्यार्थी यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे ,सचिव विजयकुमार वळंजू, एसडीओ डॉ.संदीप साळुंखे ,सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, सर्व प्राध्यापक वृंद,व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

मयुर ठाकूर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!