दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना’ स्पर्धेचे आयोजन
खारेपाटण : तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो २०२३’ चे आयोजन करण्यात आले. कार्यकर्माच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हनुमंत तळेकर,सरपंच तळेरे,
प्रमुख वक्ते प्रा.विक्रम मुंबरकर, प्रा.मधुकर घुगे माजी प्राचार्य,संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड श्री. प्रशांत धोंड हे उपस्थित होते.
दळवी महाविद्यालयात दरवर्षी विजयालक्ष्मी एक्स्पो साजरा केला जातो. यात बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर बद्दल मार्गदर्शन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कॅम्पस मुलाखती घेवून विविध कंपन्या कडून रोजगार मिळून दिला जातो, यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते. यामाध्यमातून चांगले शिक्षण रोजगार व उद्योजकता विकास करून लक्ष्मी प्राप्तीचा राजमार्ग विद्यार्थ्यांना मिळावा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली .
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय गीताने झाली. श्री.हेमंत महाडिक वरिष्ठ सहा. प्राध्यापक,दळवी महाविद्यालय, यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. “चांगले उद्योजक तुम्ही घडू शकता. तुम्ही तयार केलेली वस्तू जगात कुठेही विकू शकता,त्या करिता शिक्षण खूप महत्वाचे आहे. असे ते म्हणाले.
श्री. हनुमंत तळेकर म्हणाले कि,”विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात नाविन्यपूर्ण कार्यक्रम होत असतात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो २०२३’ माझ्या कडून शुभेच्छा”
प्रा.विक्रम मुंबरकर उद्योजकतेवर मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, “मला काहीतरी माझ्यासाठी करायचे आहे,वेगळे काहीतरी करायचे आहे,अशी ज्याच्या मनात भावना असते तोच पुढे खरा उद्योजक होवू शकतो.
प्रा.मधुकर घुगे करियर विषयी मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, स्वप्न सर्वांनी पाहायला हवेत,आणि ती स्वप्न मोठी असावीत, जेवढे मोठे तुमचे स्वप्न, तेवढा तुमच्याकडून प्रयत्न जास्त होतो”
श्री. प्रशांत धोंड यांनी थेटविक्री या विषयावर मार्गदर्शन केले.
‘नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना’ स्पर्धेचे आयोजन या वेळी करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. विविध नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पनाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश कदम यांनी केले पाहुण्यांचा परिचय साहिल बाईत व साक्षी पाळेकर या दोघांनी केला. आभार प्रदर्शन दिशा तार्लेकर हिने केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. निनाद दानी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण