सावंतवाडी शहरातील कळसुलकर विद्यालयाच्या कु.स्वरांगी खानोलकर व कु.प्रणिता आयरे यांचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत
सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सावंतवाडीत प्रशालेमार्फत मिरवणूक काढण्यात आली.
कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर प्रशालेची विद्यार्थिनी 26 जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झालेली होती.आज तिचे सावंतवाडीत आगमन झाले. याचबरोबर प्रशालेची कु प्रणिता नथुराम आयरे कॅरम खेळातून राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळवले.
सावंतवाडी गवळी तिठा पासून गांधी चौक – जय अंबे चौक मार्गे प्रशालेपर्यंत तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष श्री बबन साळगावकर, दिपक भाई मित्र मंडळ यांच्यामार्फत रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.श्रीमती परब पोलीस कर्मचारी मार्फत तिचे अभिनंदन करण्यात आले. अखिल भारतीय शिक्षक संघ अध्यक्ष श्री म.ल. देसाई, केंद प्रमुख श्रीम लंगवे मॅडम, गौड सारस्वत ब्राम्हण संघटना, आर्यगृहन्वेश वसाहत, अनिल परुळेकर, सेवानिवृत्त सैनिक संघटना सावंतवाडी,श्री शिवाजीराव भिसे व्यायाम शाळेचे श्री सुधीर हळदणकर, सावंतवाडी शाळा नंबर-2 व सावंतवाडी शाळा नंबर-4, आरोग्य भुवन रिक्षा संघटना,शाळा व्यवस्थापन समिती,पालक-शिक्षक संघ, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांकडून या दोघीही विद्यार्थिनींचे शाल,पुष्पगुच्छ,रोख रक्कमा देऊन स्वागत व अभिनंदन केले.कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये या दोन्हीही विद्यार्थिचां सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागत गीताने मान्यवरांचे सत्कार मूर्तींचे स्वागत करण्यात आले.यावेळेस व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ५८ महाराष्ट्र बटालियन ओरसचे सेना मेडल प्राप्त कर्नल ,दीपक कुमार दयाल, सुभेदार मेजर श्री गेडाम, सुभेदार मेजर श्री शेडगे, नायब सुभेदार श्री समीर नाईक, हवालदार श्री दिलीप राऊळ, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव डॉ श्री प्रसाद नार्वेकर, सहसचिव श्री गौरंग चिटणीस, खजिनदार श्री मुकुंद वझे, संचालिका सौ राजश्री टिपणीस,सदस्या श्रीम श्रद्धा नाईक, सत्कारमूर्ती कु. स्वरांगी संदीप खानोलकर, सौ.स्वप्नजा खानोलकर तसेच कुमारी प्रणिता नथुराम आयरे, प्रणिताची आई सौ.मीनाक्षी आयरे, सावंतवाडी केंद्रप्रमुख लंगवे अन्य शिक्षवृंद उपस्थित होते.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सावंतवाडी