कुंभारमाठ जरीमरी देवी जत्रोत्सवाच्या निमित्ताने नेत्र तपासणी शिबीर

युवासेना उपविभागप्रमुख ग्रा प सदस्य राहुल परब यांच्या हस्ते उदघाटन
200 हुन अधिक ग्रामस्थांनी घेतला लाभ
कुंभारमाठ गावातील मानाची समजला जाणारा जरीमरी जत्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ व भाविकांसाठी
विवेकानंद नेत्रालय यांच्यामार्फत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यास ग्रामस्थ भिवा वाघ यांनी जागा उपलब्ध करून दिली. यावेळी शाखाप्रमुख सदानंद करंगुटकर,महिला शाखाप्रमुख शितल देऊलकर, माजी सरपंच वैशाली गावकर,ग्रा.प.सदस्य सोनाली डिचवलकर, मुक्ता राजपुत,स्वती तांडेल,आकांक्षा गावकर,समीर टाकेकर,संजय देऊलकर आदो उपस्थित होते.