डॉ. सायली कामत हिचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार

दंतवैद्यकीय क्षेत्रातील एमडीएस परीक्षेत मिळवले यश

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती

दंत वैद्यकीय क्षेत्रातील एमडीएस परीक्षेमध्ये कणकवली मधील डॉ. सायली महेश कामत हीने विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केल्याबद्दल कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तिचा सन्मान चिन्ह देत सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, मेघा गांगण, राजू गवाणकर,हर्षदा गवाणकर, दानिश गवाणकर आदी उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!