सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा भाजप जिंकेल – भाजपा नेते निलेश राणे

पक्षाने दिलेले कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवा;

कार्यकर्त्यांना केले आवाहन

प्रतिनिधी । कुडाळ : येणारी लोकसभा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा भाजप मोठ्या संख्येने विजयी होईल असे भाजपा माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या नव मतदार नोंदणी चेतना अभियानाच्यावेळी सांगितले. पक्षाकडून दिलेले कार्यक्रम हे प्रत्येकाने राबवले पाहिजेत त्यामुळे पक्षाचे विचार आणि भाजपाने केलेल्या केंद्र व राज्यातील योजना या जनसामान्यापर्यंत जातील असेही त्यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्याचा भाजपचा नव मतदार नोंदणी अभियानाचा कार्यक्रम कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, चारूदत्त देसाई आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पक्षाकडून आलेले कार्यक्रम कशाप्रकारे राबविण्यात आले याचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगितले की पक्षाने आपल्याजवळ जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडा जर तुम्हाला ही जबाबदारी पार पाडता येत नसेल तर ती दुसऱ्याकडे देऊन तुम्ही दुसरी जबाबदारी घ्या पण पक्षाचे काम आणि दिलेले कार्यक्रम झाले पाहिजे आता येणाऱ्या निवडणुका ह्या सर्वांसाठीच महत्वाचे आहेत त्यामुळे ही कामे केली पाहिजे येणारी लोकसभा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा या भाजप जिंकेल यात शंका नाही असे सांगून कुडाळ तालुक्यामध्ये भाजपचे चांगल्या प्रकारे काम सुरू असून पक्षाने दिलेले कार्यक्रम राबवण्यामध्ये कोकणात कुडाळचा दोन नंबर लागतो त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे पण हा एक नंबर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा लोकांपर्यंत शासनाच्या योजना सांगा असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमांमध्ये प्रसाद यादव यांनी नव मतदार नोंदणी संदर्भात माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केले तर आभार कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी मानले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!