ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी या मंडळाचा अनोखा उपक्रम.उपक्रमा अंतर्गत गावातील ज्येष्ठ लोकांना मोफत पंढरपूर दर्शन
आचरा- ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी या मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे या उपक्रमांतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिक लोकांना मोफत पंढरपूर दर्शन वारी घडून आणल पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून गावातील 40 ज्येष्ठ नागरिक लोकांना मोफत पंढरपूर दर्शन घडविण्यात आले. यामध्ये पंढरपुर वारी 26 रोजी श्री देव चव्हाटा येथून निघालेली ही पंढरपुर वारी प्रथम कोल्हापूर संस्थान मधील महालक्ष्मी दर्शन करून तदनंतर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्तात्रय दर्शन घेऊन पुढे जात खिद्रापूर येथील प्राचीन श्री कोपेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी आर के फाउंडेशन सदलागा याच्या वतीने मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत आर के फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम आणि त्यांचे सहकारी यांनी वारीचे खिद्रापूर येथे प्राचीन श्री कोपेश्वर मंदिर येथे स्वागत करत वारीतील विठ्ठल भक्तांना प्रसादासाठी केळी वाटप केले. पर्यावरणाचा वारसा जपणाऱ्या आणि ज्येष्ठांसाठी नेहमीच अविरत पुढे असणाऱ्या श्री ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी यांच्या वतीने पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कल्पवृक्षाची रोपे प्रदान करण्यात आली.यानंतर ही वारी पंढरपूरला पोहोचली पंढरपूरला पहाटे काकड आरती च्या सोहळ्यास उपस्थित राहत वारीतील विठ्ठल भक्तांनी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेऊन दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजता श्री देव चव्हाटा या वारीची सांगता झाली मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण कुबल आणि त्यांचे कार्यकारी मंडळ सदस्य यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व पिरावाडी ग्रामस्थांनी कौतुक केले या वारीचे सारत्य करणारे चालक श्री सुनील तारी यांचाही श्री देव चव्हाटा येथे सत्कार करण्यात आला. या पंढरपुर वारी निमित्त दिनांक 30/08/2023 रोजी श्री देव चव्हाटा येथे गंगापूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
आचरा–अर्जुन बापर्डेकर