कणकवली सभापतीपदी हर्षदा वाळके

उपसभापतीपदी राजेश उर्फ सोनू सावंत यांची निवड

तब्बल चार वर्षानंतर कणकवली तालुक्याला सभापती उपसभापती

कणकवली सभापतीपदी नांदगाव पंचायत समिती गणातून बिनविरोध विजयी झालेल्या हर्षदा वाळके आणि उपसभापतीपती वरवडे पंचायत समिती मधील भाजपाचे विजयी उमेदवार सोनू सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रिये करिता पिठासन अधिकारी म्हणून दीक्षांत देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण सहाय्यक गट विकास अधिकारी मनोज वालावलकर विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते. त्यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल चार वर्षानंतर कणकवली तालुक्याला सभापती उपसभापती मिळाले आहेत.

error: Content is protected !!