अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी मैत्रीकरून त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन गुणाजी परब याची सिंधुदुर्गच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ तथा विशेष न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्याच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

मे २०२१ ते मे २०२२ या कालावधीत विवाहीत आरोपीने अल्पवयीन मुलीशी ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही मैत्रीकरून त्याचा गैरफायदा घेत तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (जे एन) २७६ (२) ५०४, ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ४, ६, ८ १० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला जुलै २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. यापुर्वी आरोपीचा जामिनअर्जही फेटाळण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीचा जामिन अर्ज मंजूर करताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, फिर्यादी व सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणू नये, तसेच फिर्यादीच्या गावात प्रवेश करू नये, अशा अटींसह जामिन मंजूर केला आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!