आवळेगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी रामचंद्र उर्फ महेश मोहन सावंत यांची बिनविरोध निवड

निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन!!

प्रतिनिधी । कुडाळ : शासन आदेशानुसार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी रामचंद्र उर्फ महेश सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या आवळेगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत हि निवड करण्यात आली.
महेश सावंत हे आवळेगाव टेम्बगावचे भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कायम आघाडीवर असतात. त्यामुळे ते या पदाला नक्कीच न्याय देऊन आवळेगावचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास उपस्थितांनि व्यक्त केला. यावेळी आवळेगाव सरपंच पूर्वा सावंत, उपसरपंच विवेक कुपेरकर, ग्रा प सदस्य वीणा कानसे, ग्रा प सदस्य शुभदा सावंत, ग्रा प सदस्य अक्षता मोर्ये, ग्रा प सदस्य जया कानसे, ग्रा प सदस्य देवयानी मेस्त्री,
माजी सरपंच राजेंद्र सावंत, अमित तावडे, राजाराम सावंत, रवी सावंत, अविनाश सावंत, बाबल दुखंडे, पांडू कासार, अरविंद सावंत, प्रशांत परब आदी आणि ग्रामस्थ उपस्थित होते..
भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा साईल आणि आवळेगावचे शक्तीकेंद्र प्रमुख अमित तावडे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!