कणकवली येथे अवयवदान, नेत्रदान, देहदान, रक्तदान व रुग्णमित्र संकल्पना कार्यशाळा

घराघरात रक्तदाते व अवयवदान दाते व रुग्णमित्र निर्माण व्हावेत
प्रकाश तेंडोलकर यांचे प्रतिपादन
१३ ऑगस्ट जागतिक अवयव दिन व पुढील पंधरवडा साजरा करणे याचे औचित्य सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली व गोपुरी आश्रम वागदे कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान देहदान अवयवदान व रुग्णमित्र संकल्पना याविषयी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, श्री.वाडेकर देवगड, गोपुरीचे संचालक मंगेश नेवगी, विनायक उर्फ बाळू मेस्त्री तसेच विरेंद्र परब शिरोडा यांच्या हस्ते आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले.
त्यानंतर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतिने आपल्या मातोश्रींचे पहिले देहदान करणाऱ्या शिरोडा येथील रक्तदाते विरेंद्र परब शिरोडा यांचा कणकवली शाखेकडून शाल श्रीफळ, कोकण गांधी आप्पा साहेब पटवर्धन यांच्या चरित्त्राचे पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विरेंद्र परब हे एबी निगेटिव्ह डोनर आहेत, त्यांनी आतापर्यंत ३९ वेळा रक्तदान केले आहे.
सिंधु प्रतिष्ठानचे गोवा समन्वयक श्री संजय पिळणकर यांनी कार्यशाळेला शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यशाळेला खास रत्नागिरी देवरुख वरुन आलेले व गोपुरी आश्रमचे संचालक श्री. युयुत्सु आर्ते रत्नागिरी यांनी अवयवदान या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. तसेच प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी स्मशानमुक्त गाव ही संकल्पना मांडली.
अवयवदान या विषयावर अवयवदान चळवळीचे किशोर कदम कणकवली यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.
गोपूरी आश्रमचे अध्यक्ष श्री.डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं, अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केलं, युवा पिढीने यात सहभाग घेत ही चळवळ ग्रामीण भागात पर्यत पोहचवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे असं सांगून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे मुख्य संस्थापक तथा अध्यक्ष, या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक व कार्यक्राचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी अवयवदान देहदान, रक्तदान व रुग्णमित्र संकल्पना याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. ज्यामध्ये देहदान अवयवदानाचे महत्त्व, कार्यपद्धती, विविध उदाहरणांचे दाखले देत अनेक शंकाचे समाधान केले. मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४ बाबतही मार्गदर्शन केले, तसेच या सर्व विषयाबाबत कुणालाही कोणतीही अधिक माहिती किंवा सहकार्य लागले तर संस्था आपणास कुठेही संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली, तसेच
घराघरात रक्तदाते व अवयवदान दाते, देहदाते व रुग्णमित्र निर्माण व्हावेत असे आवाहनही केले.
यावेळी उपस्थितांनी आपणास पुष्कळ शिकायला मिळाले, तसेच कधीही न ऐकलेली माहिती मिळाल्याचे आवर्जून सांगितले व देहदान अवयवदान यांची जागृती करणार असल्याचेही सांगितले.
कार्यशाळेत सुमारे ८५ लोकांनी सहभाग घेतला त्यापैकी २३ लोकांनी नेत्रदान व अन्यजणांनी अवयवदानचे अर्ज भरले तर ४ जणांनी देहदानाचे अर्ज भरले. देहदानाचा अर्ज भरण्यासाठी खास देवगड वाडा येथून ७५ वर्षे वयाचे श्री वाडेकर व कुडाळ वरुन श्री सुधाकर पाद्ये वय ६५ वर्षे हे उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये प्रतिष्ठानच्या वतीने देहदानाबाबत माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले, तसेच देहदान अवयवदानाचे अर्ज वाटप करण्यात आले. उपस्थित सर्वांना प्रतिष्ठानच्या वतिने कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यशाळेकरिता सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाश तेंडोलकर, गोपूरी आश्रम अध्यक्ष श्री. डॉ. राजेंद्र मुंबरकर, गोपुरी आश्रम संचालक युयुत्स आर्ते, गोपुरी आश्रम सचिव श्री मंगेश नेवगे, संचालक विनायक उर्फ बाळू मेस्त्री, श्री प्रकाश कदम, प्रतिष्ठानचे गोवा समनव्ययक श्री. संजय पिळणकर, श्री. विरेंद्र परब, NSS विभाग प्रमुख कणकवली कॉलेज श्री सुरेश पाटील , सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुकाध्यक्ष श्री. अमोल भोगले, कार्याध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, सचिव सुहासिनी कुलकर्णी, उपाध्यक्षा स्नेहल हजारें, खजिनदार सुशील परब, सदस्य बाबू राणे, दुर्गाप्रसाद काजरेकर,
सहभागी कणकवली कॉलेज NSS विद्याथी, सामाजिक कार्यकर्ते, बचत गट महिला आदी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यात अशा अधिकाधिक कार्यशाळा घेणार असल्याचे प्रतिष्ठानचे कणकवली तालुकाध्यक्ष श्री अमोल भोगले यांनी सांगितले व उपस्थितांचेे आभार मानले
कणकवली प्रतिनिधी