विमा सल्लागार व हॉटेल व्यावसायिक जितेंद्र हरयाण यांचे निधन

कणकवली तालुक्यातील करुळ येथील रहिवासी, विमा सल्लागार तसेच हॉटेल व्यावसायिक जितेंद्र परशुराम हरयाण (वय ५१) यांचे सोमवारी (२ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने करुळ, कणकवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जितेंद्र हरयाण यांना रविवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा-बांबोळी येथे सोमवारी सायंकाळी नेण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता करुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जितेंद्र यांनी काही काळ वित्तीय संस्थांमध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी कणकवली व करुळ येथे हॉटेल व्यवसायासह कापड व्यवसायही केला. ते उत्तम कवी म्हणूनही परिचित होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमी सक्रिय सहभागी असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!