कणकवली भाजपा पुरस्कृत दिवाळी बाजाराचा आज पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

अनेक घरगुती फराळांच्या वस्तू व अन्य दिवाळी साहित्य मिळणार एकाच जागेवर

दिवाळीच्या निमित्ताने गेली आठ वर्ष सुरू असलेला कणकवली भाजपा पुरस्कृत दिवाळी बाजाराचा शुभारंभ मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कणकवली पेट्रोल पंपाच्या समोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार भरणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर या व अन्य पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या दिवाळी बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केले आहे.

error: Content is protected !!