संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘प्रीमियर बोर्डिंग स्कूल पुरस्कार’

अतिग्रे – नुकत्याच हॉटेल क्लार्क्स आमेर जयपूर या ठिकाणी झालेल्या ‘वैश्विक शैक्षणिक कार्यक्रमात 2023’ स्कु न्यूज यांच्यामार्फत संजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कुलला सन 2023-24 चा ‘प्रीमियर बोर्डिंग स्कूल’ पुरस्कार पंजाबचे माजी राज्यपाल व्ही पी सिंग बदनोरे आणि थिंक ग्लोबल स्कूलचे एमडी श्री रसेल जॉन कैली यांच्या हस्ते प्राप्त झाला. यावेळी मेवाडचे राजा लक्ष सिंग, मेजर जनरल पुत्रार्जुनम, लेफ्टनंट जनरल सुरेंद्र कुलकर्णी, लेफ्टनंट कर्नल शेखर हे उपस्थित होते. हा अवॉर्ड शाळेच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती व बोर्डिंग स्कुल प्राचार्य डॉ. एच एम नवीन यांनी स्वीकारला.
या अवॉर्ड प्रसंगी बोलताना संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती म्हणाल्या हा अवॉर्ड विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या कष्टामुळे व प्रेमामुळेच शाळेला प्राप्त झाला आहे. बोर्डिंग स्कुलमध्ये दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्कार शिबिरे, दैनंदिन योगासन, प्राणायम, इयत्ता दहावी, बारावीचा शाळेचा सर्वोच्च निकाल, विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचे यश, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले नावलौकिक, सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन या सर्वांचे फलित म्हणजेच हा अवॉर्ड आहे.
प्रशस्त शाळेची इमारत, वसतिगृह, क्रीडांगण, विविध खेळांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक ग्रंथालय, प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, उच्चशिक्षित शिक्षक, अध्ययनपूरक वातावरण, विविध पुरस्कार यामुळे संपूर्ण देशात संजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलने नावलौकिक प्राप्त केले आहे. या अवॉर्डमुळे आणखीन एक मुकुटमणी स्कूलच्या शिरपेचात बसला आहे. याप्रसंगी अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉ. एच एम नवीन उपप्राचार्या शोभा नवीन व सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.