आरोस येथील जिल्हास्तरीय कथाकथन तनिषा केळुसकर,चिन्मय कोटणीस,श्रावणी आरावंदेकर स्पर्धेत प्रथम
सावंतवाडी
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयल आरोस येथे मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी के.विद्याधर शिरसाट यांच्या अकराव्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस व पारिजात फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते .स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना स्मृती चषक व रोख रक्कमेची पारितोषिक,प्रमाणपत्र उत्तेजनार्थ दोन देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेची सुरुवात प्रथम प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली.तदनंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, देवी सरस्वती प्रतीमेस पुष्पहार ,पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली.जिल्हास्तरीय या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला.या स्पर्धेतील विजेते स्पर्धक खालील प्रमाणे:- पहिली ते चौथी गट १) तनिषा गुंजन केळूसकर,शाळा वेंगुर्ला नं.१, २)यश प्रवीण सावंत,मदर क्वीन सावंतवाडी.३) पार्थ उमेश सावंत, मिलाग्रीज सावंतवाडी . तर उत्तेजनार्थ १) दुर्वा मनोज राऊळ,माडखोल नं.१. दुसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी- १) चिन्मय विक्रम कोटणीस ,कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी.२) नील नितीन बांदेकर, केंद्र शाळा बांदा नं.१, ३) तनुष्का हरिदास मेस्त्री ,गिरोबा विद्यालय आरोस,तर उत्तेजनार्थ- १) अश्मी प्रवीण मांजरेकर,आर पी डी , सावंतवाडी,२) कनक दिनानाथ काळोजी, आजगाव नं.१,तिसरा गट – इयत्ता आठवी ते दहावी – १) श्रावणी राजन आरावंदेकर ,कुडाळ हायस्कूल,२)शरयू देवेंद्र कुबल ,विद्या विकास हायस्कूल,आरोस ३)स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर, न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा. तर उत्तेजनार्थ – १) गौरवी हेमंत नाख्ये ,जनता विद्यालय तळवडे,२) प्रज्ञा तुषार मोर्ये , खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल ,बांदा यांना गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन केले. शिक्षक भारती सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री संजय वेतरेकर यांनी कै.शिरसाट सरांच्या आठवणीला उजाळा दिला.शिरसाट सरांच्या कार्याची ओळख भावी पिढीला होण्यासाठी शाळेने सुरू ठेवलेल्या उपक्रमांचे श्री वेतुरेकर यांनी कौतुक केले.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून साठ सपर्धकांनी भाग घेतला होता.या स्पर्धेला संस्था अध्यक्ष बाळा परब,शाळा समिती उपाध्यक्ष सरिता नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर माध्यमिक पतपेढी अध्यक्ष श्री संजय वेतुरेकर, श्री प्रदीप सावंत , शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक श्री.सदाशिव धूपकर,ज्येष्ठ शिक्षक श्री.विवेकानंद सावंत, कलंबिस्त हायस्कूल चे श्री. जाधव सर, ,पालक शिक्षक संघ सदस्य सौ.स्वराली मोरजकर,शिक्षक लवू सातार्डेकर,उपस्थित होते.तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री.श्रीराम दीक्षित, श्री.सचिन धोपेश्र्वरकर ,श्री.चंद्रकांत सावंत यांनी काम पाहिले.
या स्पर्धेतील रोख रक्कमेची पारितोषिके व सन्मानचिन्ह ही श्रीम्.माधवी विद्याधर शिरसाट व श्री अनिरुद्ध विद्याधर शिरसाट यांनी पुरस्कृत केली होती.
या स्पर्धेचे सूत्रसंचलन मोहन पालेकर तर आभार प्रदर्शन सौ. रूपा कामत यांनी मानले.