धीरज परब यांनी घेतली माजी मंत्री महादेव जानकर यांची सदिच्छा भेट
सिंधुदुर्गच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा
प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्गच्या दौरयावर आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांची मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी भेट घेतली. यावेळी सिंधुदुगचा विकास, रोजगार आणि उद्योग यावर उभयतांमध्ये सकारत्मक चर्चा झाली. येथील लोकांनी जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे जास्तीत जास्त सहकार क्षेत्रातून आपली आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे जानकर यांनी भेटी दरम्यान सांगितल्याचे धीरज परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणाऱ्या महादेव जानकर यांच्या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून पर्यटनावर आधारित उद्योग व्यवसायांवरती स्थानिकांनी भर दिला पाहिजे. येथील पावसाचं पाणी पडून समुद्राच्या वाटे वाहून जात. त्याच पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, छोटी छोटी धरण झाली पाहीजेत, हे पाणी बारमाही उपयोगात येईल, शेती सोबत वनऔषधी लागवड होवु शकते. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि इथून मुंबईकडे जाणाऱ्या युवकांची संख्या कमी होण्यासाठी या ठिकाणीच त्यांना टुरिझम रिलेटेड व्यवसाय उद्योग करण्यासाठी मोठी सबसिडी देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे महादेव जानकर म्हणले.
सिंधुदुर्गात विज चोरी होत नाही, 100% वीज कर भरणा होते ,शेतकऱ्या आत्महत्याच प्रमाण नाही .हे खरोखर आदर्शवत गोष्ट आहे.. आपण मंत्री असताना महिलांसाठी शासना तर्फे मोफत गाई योजना राबवली होती पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपल्याला तीन ते चारच प्रस्ताव प्राप्त झाले होते. येथील लोकांनी जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे जास्तीत जास्त सहकार क्षेत्रातून आपली आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. अशा अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक विषयावर जवळपास तासभर चर्चा झाली, असे धीरज परब यांनी म्हटले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.