माध्यमिक विद्यामंदिर कणकवली प्रशालेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
कणकवली/मयुर ठाकूर
प्रशालेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मा.श्री कांबळे सर पर्यवेक्षिका सौ.जाधव मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शेळके सर, सांस्कृतिक विभाग सदस्य श्री कदम सर, सौ.केळुसकर मॅडम व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, श्री कांबळे सर आणि श्री कदम सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक श्री वनवे सर यांनीही उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रम श्री सिंगनाथ सर व श्री एस एल कदम सर यांच्या उत्तम नियोजनामुळे अतिशय उत्साहामध्ये पार पडला.