शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमार प्रशांत चव्हाण कुडाळ तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात आठवा
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघटक पंढरी जाधव यांस कडून सन्मान.
कणकवली/मयुर ठाकूर
शैक्षणिक वर्ष 2022- 23 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस एल देसाई विद्यालय पाठ तालुका कुडाळ या विद्यालयाच्या विद्यार्थी कुमार यश प्रशांत चव्हाण याने 218 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती जिल्ह्यात आठवा तर कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे त्याबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघटक तसेच संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र चे संस्थापक राज्य उपाध्यक्ष श्री पंढरी जाधव यांनी त्याचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले वेळी त्यांच्या समवेत श्री शरद जाधव,देवेंद्र कसालकर,राजू कसालकर,प्रकाश कसालकर,सुरेश कसालकर,महेंद्र कसालकर,अरुण कुणकावळेकर, तसेच त्याचे वडील श्री प्रशांत चव्हाण, आई श्री प्रीती चव्हाण हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते व त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.