माऊली मंदिर, दुतोंड वस्तीची एसटी बस सुरू करा !

नेरुरवासियांचे कुडाळ एसटी प्रशासनाला निवेदन

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ एसटी आगारातून सुटणाऱ्या माऊली मंदिर, दुतोंड वस्तीची फेरी बंद असून यामुळे विद्यार्थी वर्गाचे हाल होत आहेत. या बसफेऱ्या पुन्हा सुरू करा, या मागणीसाठी आज नेरूरवासियानी एसटी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याबाबत कुडाळ एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. पुढील दोन दिवसात या फेऱ्या सुरू होतील, असे आश्वासन एसटी अधिकाऱ्यांनी दिले.
नेरुर गावातील बरीच मुले ही कुडाळ हायस्कुल शिकण्यासाठी जातात. या मुलांना सकाळी जाण्यासाठी कुडाळ माऊली मंदिर ही गाडी सुरु होती. परंतु, मागील काही दिवस माऊली मंदिर फेरी जाणारी बंद केलेली आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची फार मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे. नेरुर मधील तसेच वालावलमधील बरीच मुले ही कुडाळ येथे शिकण्यासाठी जात असल्याने कुडाळ माऊली मंदिर ही गाडी शाळेच्या मुलांसाठी कायम सुरु करावी तसेच दरोरज संध्याकाळी कुडाळ-दुतोंड ही वस्तीची गाडी दररोज सकाळी कवठीवरुन कुडाळ येथे जाते. त्यामुळे सदरची गाडी सुध्दा मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी मिळेल. कुडाळ- माऊली मंदिर आणि कुडाळ- दुतोंड वस्तीची गाडी मुलांसाठी सुरु करण्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी रुपेश पावसकर, शेखर गावडे, मंजुनाथ फडके, प्रवीण नेरुरकर, शंभूराजे नाईक, विनय गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!