घरावर झाड पडून नुकसान

आचरा हिर्लेवाडी येथील घटना
मुसळधार पावसाने आचरा परीसरास चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे खाडीलगतची भातशेती पुर्णतः पाण्याखाली गेली आहे. जोरदार वाहणाऱ्या वारयामुळेआचरा हिर्लेवाडी येथील श्रीमती शकुंतला सहदेव खडपे यांच्या घरावर जांभळीचे झाड पडून सुमारे पंधरा हजाराचे नुकसान झाले.
गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसाने मंगळवार पासून जोर धरल्याने कालावल,पारवाडी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा फटका लगतच्या शेतीला बसला असून शेती पाण्याखाली गेली आहे. हिर्लेवाडी येथील श्रीमती शकुंतला सहदेव खडपे यांच्या घरावर जांभळीचे झाड पडून सुमारे पंधरा हजाराचे नुकसान झाले. गेले दोन दिवस सुटणारया सोसाट्याच्या वारयामुळे विद्यूत मंडळालाही फटका बसला असून विद्यूत तारा तुटून नुकसान झाले आहे. आचरा देवगड रोडवर उभ्या गाडीवर पोस्टर बोर्ड कोसळून पडला होता. सुदैवाने गाडीचे नुकसान झाले नाही.
आचरा / अर्जुन बापर्डेकर