गांधीगिरी । रस्त्यात खड्डे, खड्ड्यात वृक्षारोपण !

दारिस्तेत ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

ब्युरो । कणकवली : खड्डेमय रस्त्यांच्या समस्येला वैतागुन दारिस्ते गावात नागरिकांनी आज रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करुन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील हा गावातील मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाणी-चिखलामुळे वाहतुकीस घातक ठरत आहे, मात्र स्थानिक प्रतिनिधी आणि जिल्हा परिषद यांच्याकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षाच्या विरोधात गावातील तरुणांनी रस्त्यावर येऊन जनजागृती’ आंदोलन पुकारले आहे.
गावांमध्ये रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि खड्डेमय रस्ते ही समस्या सद्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. दारिस्ते गावात तर दैनंदिन रहदारीचे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डेयुक्त रस्त्यांची समस्या कायम असून, स्थानिक जनप्रतिनिधी या समस्येकडे कानाडोळा करत असल्याचे समोर आले आहे. गावचे सरपंच,जिल्हा परिषद सदस्य, आमदार व एकूणच संबंधित जनप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.
गावातून जाणारा हा रस्ता नागरिकांच्या दैनंदिन वापराचा असला, तरी या रस्त्याने दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. सोबतच, अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा हा रस्ता कायमच वापरला जातो. मात्र, या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि त्यामुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा गावकऱ्यांसाठी समस्येचा विषय बनला आहे. कित्येक वर्षांपासून गावातील हा मुख्य रस्ता आणि इतर रस्ते खड्डेमय झाले आहेत, मात्र स्थानिक प्रशासनाकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावातील काही नागरिक आणि तरुण मंडळींनी आता थेट आंदोलन पुकारले आहे.
मात्र, दिवसभरात या आंदोलनाकडे एकाही जनप्रतिनिधीने येऊन बघितलेही नाही अथवा दखलही घेतली नाही. अशाप्रकारे गावच्या सरपंच यानी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. आमदार व जिल्हा परिषद सदस्य यांनीही या समस्येची माहिती असूनही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, जोपर्यंत जनप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना केली जात नाही अथवा योग्य ते पाऊल उचलले जाणार नाही, तोपर्यंत रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्येचा हा प्रश्न लावून धरणार असल्याचे संबंधित आंदोलन पुकारणाऱ्या तरुणाईचे म्हणणे आहे. अन्यथा अविश्वास ठराव करुंन ग्रामपंचायत ला टाळे लावणार असल्याचे ही ग्रामस्थानी सांगितले आहे.
खरंतर, गावातून जाणार हा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे, असे म्हणून जनप्रतिनिधींकडून नेहमीच खड्ड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाला आहे. मुख्यत्त्वाने गावातल्या लोकांच्या दैनंदिन रहदारीचा असलेला हा रस्ता संकटग्रस्त झाला आहे. ऐन पावसाळ्यात हे खड्डे चिखल-पाण्याने भरतात व समस्या अजूनच गंभीर होत जाते. शाळकरी मुलांसह अनेक लोक या रस्त्यावरून प्रवास करतात. दरम्यान, गावातील काही लोकांनी आणि तरुणांनी मुख्य रस्ता बंद केला असला आणि जनप्रतिनिधींकडून तो जिल्हा परिषदेचा आहे असे सांगण्यात येत असले, तरी गावातील इतर रस्तेही असेच खड्डेमय झाले आहेत. त्यांकडेही गावच्या प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे, असे उपस्थित नागरिकांकडून कळले.
खड्ड्यांच्या समस्येसाठी गावच्या नागरीकांनी पुकारलेल्या या रस्ता बंद आंदोलनात परिसरातील वरीष्ठ नागरिक, तरुण मंडळी सहभाग नोंदवला आहे. तरुणांनी या आंदोलनाचे नेतृत्व उत्तम लोके यांनी केले आहे. यावेळी सुधाकर जाधव, लवू पवार, गणेश कदम भरणकर, लक्ष्मण तेली, विजय गावकर, सुभाष दारिस्तेकर, गणेश पवार, नामदेव मेस्त्री, संकेत मेस्त्री, दशरथ मेस्त्री, सचिन कदम, विजय चंद्रकांत गावकर, दिगंबर गावकर, संदीप गावकर, रामा गुरव, रवी गुरव, गणेश गुरव, संजय गुरव, बाळा शिरसाट, विलास सावंत, अंगुली जाधव, संतोष जाधव, मधुकर गावकर, अशोक गावकर, सुरेश लोके, परशुराम पवार, शिवा गावकर, वासू गुरव,आदि ग्रामस्थ उपस्थित होते. गावच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ही अनेक वर्षांची समस्या असून, जनप्रतिनिधींकडून जोपर्यंत योग्य निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हा विषय आम्ही लावून धरणार असल्याचेही आंदोलकांनी म्हटले आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कणकवली.

error: Content is protected !!