लायन्स क्लब ऑफ कुडाळचा पदग्रहण सोहळा उत्सहात संपन्न

अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी तर सचिव स्नेहा नाईक

प्रतिनिधी । कुडाळ : सुप्त गुणांचा विकास करताना लीडरशीप विकसित कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपले सामाजिक क्षेत्रातील काम जनतेपर्यंत पोचले पाहिजे, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे रिजन चेअरमन एमजेएफ ला. राजेद्र कासवा यांनी लायन्स क्लब ऑफ सिंधुदुर्ग पदग्रहण सोहळ्यात शनिवारी (ता 15 )रात्री केले. लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या  पदाधिकाऱ्यांचा वर्ष 2023-24 चा पदग्रहण सोहळा येथील महालक्ष्मी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात विविध उपक्रमांनी संपन्न झाला. नूतन अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी, सचिव स्नेहा नाईक, खजिनदार आनंद बांदिवडेकर, झोन चेअरमन अँड. समीर कुळकर्णी यांच्यासह लायन्स टीमने या नवीन वर्षाचा पदभार स्वीकारला
  वर्ष 2023-24चे पदाधिकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर पूनाळेकर, सीए शैलेश मुंड्ये, सूरज भोगटे, सहसचिव सीए विवेक धुरी, सहखजिनदार कुणाल वरसकर, टेमर अँड मिहिर भणगे, ट्विल ट्विस्टर मंजुनाथ फडके, पीआरओ सुधाकर कुळकर्णी, जीएसटी वैभव सावंत, जीएमटी डॉ अमोघ चूबे, जीएलटी सीए सागर तेली, अँड अजित भणगे, सुनेत्रा फाटक, सीए केशव फाटक, जी दत्ताराम, अँड अजित भण,गे सीए सुनिल सौदागर, हेमंत कुडाळकर, मनोहर कामत, डॉ विवेक पाटणकर, अँड अमोल सामंत, मंदार परुळेकर, अँड श्रीनिवास नाईक, अनंत शिंदे, नयन भणगे, स्नेहाकिता माने, अस्मिता बांदेकर, डॉ सिद्धेश बांदेकर ,रोहन सामंत, चिन्मय सामंत, मंदार शिरसाट, जीवन बांदेकर, गणेश म्हाडदळकर, डॉ चेतना चुबे, डॉ गौरव घुर्यें, मेघा सुकी, मनोज मठकर, मिलिंद बांदिवडेकर, देविका बांदेकर, श्रद्धा खानोलकर, झरणा भोमिक, प्रसाद खानोलकर, अनुप तेली, संतोष वारखनकर, डॉ  प्रकाश घोगळे, गजानन तेली, विशाल देसाई ,सुहास परब, डॉ मिलिंद बोर्डवेकर, डॉ सुशांता कुळकर्णी, डॉ प्राची तनपुरे, प्रकाश जैतापकर, प्रकाश नेरूरकर, अँड संग्राम देसाई, जयवंती परब, सुजाता तेली, दिपाली काजरेकर, चैतन्य तेरसे, ऑरोबिंडो भोमिक, संजीव प्रभू, अँड नारायण वैद्य, राजवीर पाटील, आनंद कर्पे, आदी पदाधिकारी यांनी नवीन वर्षासाठी पदग्रहण केले.
पदग्रहण सोहळा अधिकारी ला राजेद्र शाह कसवा, ला गणेश प्रभुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नवीन सभासद साईश घूर्यें, प्रशांत माने, कपिल शिरसाट, चिरायू बांदेकर, साईनाथ शिंदे, अँड राजीव कुडाळकर यांना लायन्स क्लबच्या कार्याची माहिती देत त्यांना सभासद करण्यात आले. तसेच वर्ल्डवाइल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोद झालेल्या चंद्रकांत काजरेकर, स्वरनाद कर्णबधिर शाळा शिक्षिका अनुषा कोरगांवकर, विद्यार्थी अँड अशुतोष कुळकर्णी, प्रणव वैद्य, चिरायू बांदेकर, देवराज बांदेकर, माया पूनाळेकर, पुनम पूनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक पातळीवर लायन्स क्लब सिंधुदुर्गने उल्लेखनीय कार्य केल्याबददल सीए अजित फाटक, सौ अस्मिता बांदेकर यांचा गौरव करण्यात आला.
नूतन अधयक्ष सौ कुलकर्णी यांनी लायन्स क्लबची जी आठ सेवाकार्य आहेत ती सर्वांना सोबत घेऊन राबविणार असल्याचे सांगितले. सुरवातीला डॉ विवेक पाटणकर यांनी यांनी गणेशस्तोत्र सादर केले. स्वागतगीत डॉ प्राची तनपुरे, डॉ सूशांता कुळकर्णी यांनी सादर केले. निवेदन शोभा माने व आनंद कर्पे यांनी केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!