नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिधुदुर्ग यांच्या तर्फे कणकवली जाणवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम.

संस्थेकडून पंढरी रामचंद्र जाधव यांना निसर्ग मित्र पुरस्काराने सन्मानित आणि संस्थेच्या जिल्हा संघटक पदी निवड.
पत्रकार मयुर ठाकूर यांची कणकवली तालुका युवाध्यक्ष पदी निवड
कणकवली/प्रतिनिधी.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ही सुमारे 78 देशांमध्ये कार्यरत असलेली संस्था आहॆ.या संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक पर्यावरण आणि मानवता विकास संबंधित अनेक कार्यें सुरु असतात. सिंधुदुर्ग जिल्हात जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली संस्था उल्लेखनीय कार्य करत असून आज कणकवली येथील जाणवली गावात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नारळ,सुपारी,आंबा इत्यादी स्थानिक जातीची जवळपास 25 रोपांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थित श्री पंढरी रामचंद्र जाधव यांना “निसर्गमित्र” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन संस्थेच्या “जिल्हा संघटक पदी” नियुक्ती करण्यात आली. तसेच कोकण नाऊ चॅनेल चे मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह असलेले श्री मयुर ठाकूर यांची “कणकवली तालुका युवाध्यक्ष पदी” निवड करण्यात आली.
मला मिळालेला सन्मान हा माझ्या कार्याचा सन्मान आहॆ अश्या शब्दात जाधव यांनी आभार व्यक्त केले.तर संस्था वाढीसाठी कणकवली तालुक्यात चळवळ उभी करून तालुक्यात संस्थेला उभारी देऊ अस मयुर ठाकूर यांनी आश्वासन दिले.
पंढरी रामचंद्र जाधव यांना मी कित्येक वर्षे ओळखतो.समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्यांचं कार्य हे लक्षणीय आहे.कोविडमध्ये केलेलं काम तसेच गोरगरिबांसाठी करीत असलेल त्यांच कार्य हे कौतुकास्पद आहे.त्यांना दिलेला हा “निसर्गमित्र” पुरस्कार हा सन्मान म्हणजे पुरस्काराला मिळालेला सन्मान आहे. अशा शब्दात या संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत यांनी या कार्यक्रम प्रसंगी भावना व्यक्त केल्या.तर मयुर ठाकूर यांच्या रूपात सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेला युवा संस्थेला लाभला याबद्दल देखील त्यांनी कौतुक केले.
सौ. पूजा गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा यांनी देखील श्री. पंढरी जाधव यांना “निसर्ग मित्र” पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल खास अभिनंदन केलं व कोकण विभाग अध्यक्ष श्री. बापू परब यांनी श्री. पंढरी जाधव यांची ‘नेफडो’ संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी व श्री. मयूर ठाकूर यांची संस्थेच्या कणकवली तालुका युवा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
वृक्षारोपण व निसर्गमित्र पुरस्कार प्रदान कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप सावंत,जाणवली गावचे प्रथम नागरिक सरपंच अजित सखाराम पवार,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नूतन सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पंढरी रामचंद्र जाधव,डॉक्टर श्रीरंग शांताराम प्रभू,दत्तात्रय रामचंद्र जाधव,विनोद वसंत जाधव,अशोक रामचंद्र जाधव, श्रीमती साधना पवार,श्री प्रसाद रसाळ,श्रीमती समृद्धी पावसकर, कुमारी वैभवी पावसकर,कु.प्रथमेश जाधव, कु.मंथन ठाकूर तसेच नुतन कणकवली तालुका युवाध्यक्ष पत्रकार मयुर ठाकूर आदी उपस्थित होते.