पटसंख्या टिकवण्यासाठी सरपंचांनी केला असाही प्रयोग !

सरपंच अर्चना बंगे यांनी विद्यार्थ्याला दिली सायकल भेट

अन्य शाळेत जाणारा विद्यार्थी हुमरमळा वालावल बांधकोड शाळेत स्थिरावला

निलेश जोशी । कुडाळ : सध्या पालक आपल्या मुलांना सोयीस्कर आणि आणि इतर शाळेत शिक्षणासाठी पाठवू लागले आहेत. त्यामुळे जिल्हादपरिषदांच्या शाळाना गळती लागली आहेत. त्या शाळा टिकवण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. हुमरमळा (वालावल)शाळा तु ल देसाई विद्यालय बांधकोंड ही गावातील मोठी शाळा,या शाळेतील विद्यार्थी अनेक मोठमोठ्या हुद्द्यावर व उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झाले आहेत. परंतु सध्या या शाळेला विद्यार्थी गळती लागलेली असताना ती टीकवण्यासाठी शिक्षक व सरपंच सौ अर्चना बंगे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
याचाच एक भाग म्हणून कु लावण्य विजय परकर हा विद्यार्थी बांधकोंड शाळेतुन गावाच्या बाहेर शाळेत जाऊ लागला अशातच कु लावण्य याची विनवणी चालु होती तुला पुस्तके देतो. तुला रोज फोरव्हिलरने आणुन सुखरुप घरी सोडतो. परंतु पालक व शिक्षकांच्या कोणत्याही प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही, अखेर हुमरमळा सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या घरी आई व वडील, शिक्षक ह्या विद्यार्थ्यांला घरी घेऊन आल्यावर कु लावण्य मोठमोठ्याने रडु लागताचक्षणी सरपंच सौ बंगे यांनी सांगितले तुला मी नविन सायकल घेऊन देते असे सांगताचक्षणी कु लावण्याच्या चेह-यावर हसु आले आणि आज वचनाची पुर्तता सरपंच सौ बंगे यांनी केली आणि सायकलमुळे शाळा टीकली याचा प्रत्यय आज आला. त्यामुळे पालकवर्गाची सरपंच सौ अर्चना बंगे यांचे आभार मानले यावेळी अतुल बंगे,शाळेचे मुख्याध्यापक म्हापणकर गुरुजी, युवासेनेचे मितेश वालावलकर उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!