नगरसेवक आपल्या दारी !

उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांचा लोकाभिमुख उपक्रम
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक मंदार शिरसाट हे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभागामध्ये घरोघरी भेटी देणार आहेत. त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 24 जुलै सकाळी 10.30 पासुन संपूर्ण १४ क्रमांक वॉर्ड मधील समस्या जाणून घेण्यासाठी व गाठीभेटी घेण्यासाठी नगरसेवक आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आपल्या वॉर्डातील समस्या किंवा काही सूचना असल्यास मंदार शिरसाट जाणून घेणार आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.