वालावल-हुमरमळाची मुले हुशार !

कु. यश मांजरेकर कु जयेश निर्गुण आणि कु आर्यन परब यांचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश

प्रतिनिधी । कुडाळ : 2022 23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमार यश वैभव मांजरेकर कु जयेश निर्गुण आणि कु आर्यन परब या वालावल हुमरमळा येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. पाट हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या क्लास व्यतिरिक्त कोणतेही मार्गदर्शन नसताना ही शिष्यवृत्ती मिळविले आहे. ग्रामीण सर्वसाधारण मध्ये यश यांने तीनशे पैकी २०६ गुण मिळविले असून कु जयेश निर्गुण यांने १७२ तर कु आर्यन परब २१० गुण मिळवील त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वालावल हुमरमाळा येथील समाजसेवक अतुल बंगे यानीही यशस्वी विद्यार्थ्याचे खास कौतुक केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!