शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळेला गुरुजी मिळेना

शेवटी झाराप ग्रामस्थानीउचलले महत्त्वाचे पाऊल

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री असलेल्या दिपक केसरकर यांच्या जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप केंद्र शाळा नंबर १मधे शाळेत शिकवण्यासाठी गुरुजी मिळत नसल्याने ग्रामस्थांन वर आज “शाळा बंद” आंदोलन करण्याची नामुष्की ओढवली आहे.
झाराप येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील मुख्यध्यपीका अमिता सामंत यांची आंतर जिल्हा बदली वैभववाड़ी येथे झाली असल्याने मुख्याध्यापकाचे रिक्त पद तातडीने भरावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी आज झाराप येथील भावई मंदिर येथे शाळा बंद आंदोलन केले. मात्र नेहमीप्रमाणे शिक्षणाधिकारी म्हात्रे गावकऱ्यांच्या समोर आलेच नाहीत. त्यांनी आपले सहकारी उपशिक्षण अधिकारी शेर्लेकर यांना आंदोलन स्थळी ग्रामस्थाची भेट घेण्यासाठी पाठविले.


झाराप केंद्र शाळा नंबर १मधे ६४विद्यार्थी शिक्षण घेत आहे ४ शिक्षकांची पदे मंजूर असताना सध्या २ शिक्षक या शाळेत कार्यरत आहेत .नवीन पदवीधर शिक्षक शाळेला मिळवा यासाठीचे लेखी निवेदन ग्रामस्थानी दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागला दिले. मात्र येथील कार्यरत असणाऱ्या मुख्यध्यपाक सामंत यांना दूसरा शिक्षक प्राप्त झाल्या शिवाय कार्यमुक्त केल्याने. झाराप ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले होते.
पदवीधर शिक्षक मिळेपर्यत, १ उपशिक्षक द्या मात्र तो गटसंसाधन केद्रातील किंवा सेवानिवृत्त शिक्षक नको अशी ग्रामस्थाची मागणी होती. मात्र ही मागणी सुद्धा उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर मान्य करू शकले नसल्याने मुख्याध्यापकाचे एक पद रिक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. पदवीधर शिक्षक मिळेपर्यत “शाळा बंद ‘ ठेवण्या चा निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे.
यावेळी गटशिक्षणअधिकारी संदेश किंजवड़ेकर,विनायक पाटील, सरपंच दक्षता मेस्त्री, बबन बोभाटे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण मांजरेकर नारायण मेस्त्री नितीन कुडाळकर, प्रशांत मेस्त्री, यज्ञेश गोडे, आनंद मांजरेकर, शिल्पा माणगावकर, आनंद माणगावकर, रुपेश बीडये गुरुप्रसाद पेंडुरकर,गोविंद गावकर ,गणेश हळदणकर पोर्णिमा कुडाळकर ,साक्षी तेली ,साक्षी माणगावकर, सुमन हरमलकर,अमृता परब कामिनी गावकर,आंजेलीन फर्नांडिस, दत्ताराम कुडाळकर, नवीन मालवणकर ,कैलाश परमार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!