सेवानिवृत्त बौद्ध संघटनेमार्फत रविवारी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

सावंतवाडी

सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग, या संस्थेमार्फत रविवारी सिंधुदुर्ग नगरी येथील सामाजिक न्याय भवन सभागृहात विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना अभिवादन आणि , बुद्ध वंदना करून, संविधान प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, महासचिव मोहन जाधव, कार्याध्यक्ष अरविंद वळंजू , उपाध्यक्ष आनंद धामापूरकर, सहसचिव नरेंद्र पेंडुरकर, महिला प्रतिनिधी रुपाली तेंडुलकर, श्रद्धा कदम, इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी सचिव मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष आनंद धामापूरकर यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर माजी उपजिल्हाधिकारी तथा संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद वळंजू यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यानंतर दहावी, बारावी, पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह, फोल्डर फाईल, गुलाबपुष्प व पेन इत्यादी साहित्य देऊन मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तर चालू वर्षी समाजातील सेवानिवृत्त झालेल्या व संस्थेचे आजीव सभासद झालेल्या सभासदांचाही यावेळी गौरव करण्यात आला, या सत्काराला विद्यार्थ्यांमधून समृद्धी कांबळे, वेदांत सावंत, विशाखा कदम, सदस्य आरती कदम, रूपाली तेंडुलकर, मोहन जामसंडेकर , सुहास कदम, सिद्धार्थ कदम, पालक शर्मिला कदम, दीपक जाधव, संजय सावंत इत्यादींनी मनोगते व्यक्त करून संस्थेच्या कामाबाबत प्रशंसा केली. शेवटी अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी संस्थेचा डोलारा हा क्रियाशील कार्यकर्त्यांच्या वर अवलंबून असल्याने संस्थेची अनेक उद्दिष्ट आहेत त्यापैकी पतसंस्था उभारणे हा संस्थेचा संकल्प आहे तो आपण सहकार्य केल्यास पूर्ण करू असे आवाहन केले. शेवटी रूपाली तेंडुलकर यांनी आभार मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कदम यांनी केले.

error: Content is protected !!