श्रीम. मनोरमा चौधरी यांची २२ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमानी साजरी

श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन

निलेश जोशी । कुडाळ : श्रीम. मनोरमा चौधरी यांची बावीसावी पुण्यतिथी नेरुर ग्रामपंचायत येथे ‌‍सरपंच सौ. भक्ति घाडी,यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी,व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी,सचिव संदीप साळसकर, उपसरपंच दत्ता माडदळकर, महसूल मंडळ अधिकारी ,एस.सी.गुरखे, ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ फडके, आशा मुख्यसेविका ‌संचिता कुडाळकर, आरोग्य सेविका नेहा अनुसुरकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आंदूरले, पाट, नेरुर, गोवेरी, वालावल,चेंदवण, वालावल हुमरमाळा, तेंडोली, माड्याची वाडी, आदी गावातील 42 कुपोषित मुलांना,त्यांच्या पालकांच्या व विभागिय आशा सेविकांच्या उपस्थितीत, ट्रस्टतर्फे ड्रायफ्रूट्स व अंडी यांच वाटप करण्यात आल.
यावेळी चौधरी यांनी मार्गदर्शन करताना 1999 पासून या ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध माध्यमातून समाजकार्य केले जात आहे त्याचा आढावा कथन केला व भविष्यात ज्या ज्या वेळी सहकार्य लागेल ते ते करण्याच आश्वासन दिलं. सरपंच भक्ती घाडी याानी एवढा स्तुत्य कार्यक्रम आपल्या ग्रामपंचायतमध्ये घेतल्याबद्दल ट्रस्टला धन्यवाद दिले. मंडल अधिकारी गुरखे यांची मालवण तालुक्यात बदली झाल्यामुळे, विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन ट्रस्टतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुरखे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, चौधरी हे फक्त समाजसेवा करत नसून महसूलच्या माध्यमातून जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. याच माध्यमातून त्यांची आणि माझी ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर नंतर मैत्रीत झालेल आहे.
ट्रस्टचे सचिव संदीप साळस्कर यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये ट्रस्टच्या स्थापनेपासूनचा कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंजुनाथ फडके यांनी केले. यावेळी ट्रस्टर्फे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संचिता कुडाळकर, आशा रावुळ यांच मोलाच सहकार्य लाभलं.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!