नेरूरपार येथे उद्या श्रीम मनोरमा चौधरी स्मृती रंगभरण चित्रकला स्पर्धा

प्रतिनिधी । कुडाळ : श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्रीमती मनोरमा चौधरी स्मृतिदिनानिमित्त रंगभरण स्पर्धा आयोजित केलेली आहे. रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे सकाळी दहा वाजता रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे यासाठी गट पुढील प्रमाणे
गट क्रमांक एक पहिली ते दुसरी
गट क्रमांक दोन तिसरी ते चौथी
गट क्रमांक तीन पाचवी ते सातवी
गट क्रमांक चार आठवी ते दहावी
सहभागी सर्व स्पर्धकांनी शाळेमार्फत आपली नावे ट्रस्ट सचिव श्री संदीप साळसकर यांच्या व्हाट्सअप नंबर ९४२२५८५६१० येथे पाठवावीत प्रथम तीन क्रमांकासाठी प्रमाणपत्र शिल्ड र्आणि बक्षीस दिले जाईल या स्पर्धेचे कोणतेही प्रवेश शुल्क नसून जास्तीत जास्त या विद्यार्थ्याने स्पर्धेत सहभागी व्हायचे असे आव्हान ट्स्ट अध्यक्ष श्री दयानंद चौधरी यांनी केलेले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!