संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाईसाहेब तळेकर यांच्याअध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प.पू.संत राऊळ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून वर्धापन दिन सोहळ्याचा प्रारंभ झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.झोडगे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या सोहळ्याचे औचित्य सांगून सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले.
क.म.शि.प्र.मंडळाचे पदाधिकारी सुरेश चव्हाण, केदार सामंत, महेंद्र गवस, महाविद्यालयाच्या सी.डी सी.समितीचे सदस्य डॉ.रवींद्र जोशी, राजू केसरकर व निवृत्त माजी प्राचार्य डॉ.ए.एम.पठाण, माजी प्राचार्य डॉ.एस.बी.सावंत, शिवाजी घोगळे, निवृत्त कर्मचारी मोहन मांजरेकर सगुण पेडणेकर, सुधाकर घोगळे तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष . ऍड. निलांगी रांगणेकर, महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे पहिले जी.एस.व कुडाळ पंचायत समिती माजी सभापती सुनील भोगटे,महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष राजू कदम, सचिव प्रा.अरुण मर्गज, प्रा.समीर तारी व इतर माजी-आजी विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळ या प्रा.डॉ.व्ही.जी.भास्कर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुस्तकासंबंधी प्रा.डॉ.व्ही.जी.भास्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाल व श्रीफळ ,सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे प्रा.प्रवीण बांदेकर व श्री व सौ. पठाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या वतीने माजी प्राचार्य,माजी कर्मचारी,माजी विद्यार्थ्यांचा या प्रसंगी गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एन.लोखंडे यांनी घेतला. नुकताच महाविद्यालयाचे डॉ.वाय.जे.कोळी आणि त्यांच्या सात विद्यार्थ्यांना स्पेसिस हॅबिटॅट वॉरियर पुरस्कार मुंबई तरुण भारत व महाराष्ट्र टुरिझम यांचा पुरस्कार मिळाला त्या निमित्त या सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे,समाज भान ठेवून विचार केला पाहिजे तसेच सामाजिक माध्यमांचा वापर जाणीवपूर्वक केला पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील असून महाविद्यालयाने नॅक पुनर्मूल्यांकनासाठी सज्ज होण्याचे आवाहन क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री.भाईसाहेब तळेकर यांनी केले व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य ए.एम.पठाण यांनी उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांची व शिक्षकांची भूमिका काय असावी याबद्दल आपले विचार मांडले. प्राचार्य डॉ.एस.बी.सावंत ,प्रा.अरुण मर्गज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी आपल्या मनोगतात द्वारकानाथ घुर्ये यांनी शिक्षकांनी नेहमी सत्याचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना अध्यापन करावे असे म्हटले. माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष ऍड. निलांगी रांगणेकर यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणी सांगून विद्यार्थ्यांनी अद्ययावत शिक्षण घेण्याचे आवाहन केले. आभार लेफ्ट.डॉ.एस.टी.आवटे मानले यांनी तर सूत्रसंचालन प्रा.संतोष वालावलकर यांनी केले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!