आमदार नितेश राणेंकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेचा आढावा

वैद्यकीय अधीक्षक नागनाथ धर्माधिकारी यांच्यावर राणेंचा संताप

आवश्यक साधनसामग्री बाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वारंवार भेडसावत असणारे प्रश्न आणि समस्याबाबत आढावा घेण्यासाठी आज उपजिल्हा रुग्णालयाला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात वारंवार उद्भवणाऱ्या समस्या आणि बिघाड याबाबत माहिती घेतली. बिघाड झालेल्या मशिन बाबत देखील आढावा घेतला व वारंवार गैरहजर असणारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना जाब विचारला.यापुढे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या समस्या उद्भवता कामा नये,कणकवली रुग्णालय सोडून कोणत्याही रुग्णाला इमर्जन्सी व्यतिरिक्त ओरोस,कुडाळ, सावंतवाडीला पाठवू नका,अशी सक्त सूचना देखील दिली.
उपजिल्हा रुग्णालयात वारंवार रुग्णसेवेत भेडसावणाऱ्या समस्या या यापुढे जाणवता नयेत.काही अडचणी असतील किंवा औषध, स्टाफ कमी पडत असेल तर आम्हाला कळवा आम्ही आरोग्य मंत्र्यांशी बोलून याठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करून घेतो असे आश्वासन देखील दिले.
यावेळी हॉस्पिटल स्टाफ ची सेवा योग्य असली पाहिजे,हॉस्पिटल ची खोटी माहिती ऐयकायला आम्ही इथं आलो नाहीत असेही श्री राणे यांनी सांगितले. राज्य सरकार कडून आवश्यक गोष्टी हव्या असतील तर सांगा पण इथली वास्तू खराब करायची नाही,तर इथं चांगली रुग्ण सेवा द्यायची मानसिकता ठेवा.ओरोस कुडाळ सावंतवाडी मध्ये पेशंट जाता नयेत याची काळजी घ्या.बंद असलेल्या ICU विभागाची माहिती घेऊन योग्य ती साधन सामग्री व मशिनरी उपलब्ध करून घेऊ असंही सांगितल.नॉर्मल डिलिव्हरी उपजिल्हा रुग्णालयात होत नाही, संबंधित अधिकारी नसतात, पेशंट ओरोस सावंतवाडीला रेफर होतात,प्रत्येकाचे प्रॉब्लेम पेशंट पेक्षा मोठे झालेले आहेत,मी नसेन तर हे चालणार नाही ही मानसिकता बंद करा,अन्यथा बाहेर बोर्ड लावू असेही श्री राणे यावेळी म्हणाले.धर्माधिकारी इथं किती दिवस राहतात ? रहाणार ? इथल्या पदाला न्याय देणार का यावर आमचे सूक्ष्मपणे लक्ष असून आम्ही वारंवार याचा आढावा घेत राहणार आहोत. इकडची सेवा सुरळीत करायला आम्ही कितीही झटलो तरी तुमची मानसिकता बदलेपर्यंत त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही हॉस्पिटल सुरळीत चालवत आहात तर का तक्रारी येतात ? दम भरल्यावर तुम्ही इथं राहत आहात आधी फॅसिलीटी पेक्षा मानसिकतेत सुधारणा करा, चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असे म्हणत डॉक्टर धनंजय रासम यांचे चांगली सेवा देत असल्याबद्दल अभिनंदन देखील केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गटनेते संजय कामतेकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यावेळी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!